लोकसभेच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्र्यांनी तामिळ भाषेत प्रतिसाद दिल्याची घटना शुक्रवारी लोकसभेत पाहावयास मिळाली. देशातील फटाक्यांच्या एकूण मागणीपैकी बहुसंख्य मागणी पूर्ण करणाऱ्या तामिळनाडूतील शिवकाशी येथील उद्योगावर चिनी उत्पादनांच्या आक्रमणामुळे संक्रांत आली आहे, या मुद्दय़ाकडे सरकारचे लक्ष आहे काय, असा पुरवणी प्रश्न एआयएडीएमके खासदार टी. राधाकृष्णन् यांनी उपस्थित केला. स्वत: तामिळनाडूतील असून तामिळी कुटुंबातील व्यक्तीशीच विवाहबद्ध झालेल्या केंद्रीय वाणिज्य आणि अर्थ राज्यमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सभापतींकडे तामिळमधून उत्तर देण्याची परवानगी मागितली. तामिळनाडूच्या क्रांतिकारी मुख्यमंत्री जयललिता यांनी याबाबत केलेला पत्रव्यवहार आपण पाहिला असून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उत्तर सीतारामन् यांनी तामिळ भाषेतून दिले. लोकसभेत असा प्रसंग घडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ होती.

    

Story img Loader