‘ब्रॅण्ड बिहार’ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जद(यू)चे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता विकिपीडियाचा आधार घेतला आहे. ‘बिहार ऑन विकिपीडिया’ प्रचाराचा आरंभ त्यांनी शुक्रवारी केला.बिहारचा सुवर्ण इतिहास, संस्कृती, परंपरा, महान व्यक्तिमत्त्व याबाबत संपूर्ण जगाला माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही विकिपीडियाचा आधार घेतला असल्याचे नितीशकुमार म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्रिपद नऊ वर्षे भूषविणाऱ्या नितीशकुमार यांनी आपल्या संदेशात युवकांना आपल्या गावाबद्दलची माहिती, परंपरा याबद्दलचे लिखाण करण्याचे आवाहन केले.