महायुतीच्या समन्वय समितीच्या बठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. या पुढे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नव्याने जागावाटप अशक्य असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हातकणंगले मतदार संघातील सांगली जिल्ह्यातील समाविष्ट गावांमध्ये मतदारांशी चर्चा करण्यासाठी खा. शेट्टी आज दुधगांव येथे आले होते. महायुतीत समन्वय रहावा यासाठी समन्वय समिती सामिल घटक पक्षांच्या नेत्यांची तयार करण्यात आली आहे. निवडणुकीतील ध्येयधोरणासंदर्भात समन्वय समितीच्या बठकीत चर्चा करण्यात आली. या चच्रेवेळी राज ठाकरे यांच्या मनसेच्या सहभागाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसा प्रस्तावही समन्वय समितीसमोर आलेला नव्हता.
नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेल्या चच्रेच्या पाश्र्वभूमीवर खा. शेट्टी म्हणाले की, महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. मनसेला सहभागी करायचे म्हटले तर फेर जागावाटप करावे लागेल. हे अशक्य आहे.
मनसेच्या सहभागाबद्दल चर्चा नाही -राजू शेट्टी
महायुतीच्या समन्वय समितीच्या बठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2014 at 01:51 IST
TOPICSमनसेMNSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No discuss on mns participation raju shetty