नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वरीलपकी कुणीच नाही’ अर्थात, ‘नन ऑफ दि अबोव्ह’ म्हणजेच ‘नोटा’च्या प्रथमच मिळालेल्या अधिकाराचा किती मतदारांनी वापर केला, याबद्दलची कमालीची जी सार्वत्रिक उत्सुकता होती. विशेषत: अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांत या अधिकाराचा वापर सर्वाधिक चच्रेचा विषय होता.
महाराष्ट्रात ४८ जागांपकी अमरावती, रामटेक, सोलापूर, लातूर आणि शिर्डी हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, तर नंदूरबार, पालघर, िदडोरी व गडचिरोली-चिमूर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या मतदारसंघांत ‘नोटा’ अधिकाराचा वापर किती मतदारांनी केला, हे पाहिले तर नंदूरबारमध्ये २१ हजार १७८ मतदारांनी नोटाचा वापर केला. पालघरमध्ये २१ हजार ७२६ मतदारांनी, गडचिरोली-चिमूरमध्ये २४ हजार ६७२, शिर्डीमध्ये ८२४४, अमरावतीमध्ये ४१४९ मतदारांनी नोटाचा वापर केला.
यवतमाळ-वाशीम हा खुला मतदारसंघ आहे. मात्र, काँग्रेसने या मतदारसंघात आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी दिली होती. याही मतदारसंघात ५५८३ मतदारांनी नोटाचा वापर केला. अर्थात, केवळ अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघांतच नोटाचा वापर झाला नाही, तर इतर मतदारसंघांतही ‘नोटा’ चालला. विदर्भात नागपूरमध्ये ३४६०, बुलढाण्यात १० हजार ५४६, भंडारा-गोंदियात ४०३२, वर्धा मतदारसंघात ३३४३, चंद्रपूरमध्ये ८६७६, अकोला मतदारसंघात ६२०६ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. परभणी, शिरूर, मुंबई, नाशिक, सांगलीसारख्या मतदारसंघांतही नोटा बऱ्यापकी चालला.
गवळींचा अंदाज खरा ठरला
यवतमाळ-वाशीम या खुल्या मतदारसंघात काँग्रेसने माझ्यासारख्या आदिवासी उमेदवाराला उभे केले असले तरी हा मतदारसंघ राजकीयदृष्टय़ा जागरूक मतदारसंघ आहे. त्यामुळे नोटाचा वापर क्वचितच होईल, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री व काँग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केला होता. मात्र, साडेपाच हजार मतदारांनी नोटाचा वापर करून मोघेंचा अंदाज चुकीचा ठरवला. सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे की, मतदार सुज्ञ असून त्यांना काम करणारा व प्रश्न सोडवणारा नेता हवा असतो.
मध्य प्रदेशात ३ लाख ९१ मतदारांचा ‘नोटा’वर शिक्का
भोपाळ ‘नोटा’ या पर्यायावर मध्य प्रदेशातील तब्बल ३ लाख ९१ हजार ७९७ मतदारांनी शिक्का मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील २९ लोकसभा मतदारसंघांमधील हे मतदार आहेत. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आणि पोस्टाने मतदान करण्याच्या सुविधा वापरताना ३ लाख ९१ हजार ७९७ मतदारांना ‘नोटा’वर शिक्का मारला असून यापैकी सर्वाधिक ३० हजार ३६४ मतदार रतलाम मतदारसंघातील असून सर्वात कमी ४ हजार २१९ मतदार ग्वाल्हेर मतदारसंघातील आहेत. बालाघाटमध्ये ६ हजार ९२२, बेतूलमधील २६ हजार ७२६, देवास मतदारसंघातील १०२५३, गुणामधून १२ हजार ४८१, इंदूर येथून ५ हजार ९४४, जबलपूरमधील ७ हजार ८८८, खजुराहोमधील ७ हजार ८३८, खांडवा येथे १७ हजार १४९, खरगोनमधील २२ हजार १४१ आणि राजगड येथील १० हजार २९२ मतदारांनी ईव्हीएम मशीनमधील ‘नोटा’चे बटण दाबले. मोरेना मतदारसंघातून ४ हजार ७९२, मांडला येथून २८ हजार ३०६, मंदासौर येथून ८ हजार ५६८, भिंडमधून ५ हजार ५७२, विदिशा येथून १० हजार ६१८, भोपाळमधून ५ हजार १८१, उज्जैनमधून १२ हजार २८७, टिकमगढमधून १० हजार ५५, सिधी येथून १७ हजार ३५० मतदारांनी नोटाचा वापर केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा