आपल्या जवळच्या नातेवाईकांची आपले प्रतिनिधी म्हणून त्याचप्रमाणे गट किंवा अधिसूचित क्षेत्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करू नये, असा आदेश बीजेडीचे अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना दिला आहे.
कुटुंबातील सदस्य अथवा जवळचे नातेवाईक यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करू नये, कारण त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य खचते. त्याचप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून आपल्या नातेवाईकांना गट अध्यक्ष अथवा अधिसूचित क्षेत्र परिषदेचे अध्यक्ष करण्यासही आपला विरोध आहे, असे पटनाईक यांनी म्हटले आहे.
प्रतिनिधींमुळे काही वेळा खासदार आणि आमदार यांच्या नावाला बट्टा लागतो, त्यामुळे आपले प्रतिनिधी नियुक्त करताना काळजी घ्यावी, अशा सूचना पटनाईक यांनी दिल्या असून तसे परिपत्रकच जारी केले आहे. पक्षाचे उत्तम आणि परिणामकारक कार्यकर्त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी विकासनिधीचा वापर करण्यापूर्वी खासदारांनी स्थानिक आमदारांशी सल्लामसलत करावी, आपल्याला खासदारांचा गट, आमदारांचा गट अशी कुजबुज ऐकावयास आवडत नाही, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा