दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. पंकजा यांना केंद्रात मंत्रिपद आणि लोकसभेची उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेश नेत्यांकडून केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठक विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झाली. मुंडे यांच्या निधनानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची पुढील दिशा व वाटचाल याविषयी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja inducted into maharashtra bjp