गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर तेराव्यालाच व्यासपीठावर आलेल्या आमदार पंकजा मुंडे यांनी ‘मोडेन पण वाकणार नाही’ असे सांगत स्वत:ला सावरले. पंकजा यांच्या कणखर भूमिकेमुळे राज्यभरातील सैरभैर झालेल्या मुंडे समर्थकांमध्ये ‘जान’ आली असून आता यापुढे पंकजाच आपल्या ताईसाहेब, त्याच आपले भविष्यातील नेतृत्व असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सोशल मीडियातूनही पंकजा याच ताईसाहेब, त्याच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असे संदेश फिरू लागले आहेत. वडिलांनीच पक्षाला जोडलेल्या लाखो लोकांना मी भेटणार आहे आणि सत्तापरिवर्तनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचणार असल्याची ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. या पाश्र्वभूमीवर बीडमधील भाजप कार्यकर्ते पंकजा यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत.

Story img Loader