भाजपप्रणीत सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. एरव्ही निवडणुकीपूर्वी सतत बोलणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मौन झाले, ही विरोधकांनी केलेली टीका, तर राहुल गांधी यांच्या सरकारविरोधात वेलमध्ये येण्याने हे अधिवेशन गाजले. गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांच्या तुलनेत हे अधिवेशन सर्वात यशस्वी ठरले, असा दावा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी केला.
गतवर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ १९ तास ६७ मिनिटे कामकाज झाले होते. यंदा मात्र आम्ही लोकसभेचे कामकाज १६६ तास ५६ मिनिटे चालवले, असा दावा करीत नायडू यांनी सरकारची पाठ थोपटून घेतली. राज्यसभेत १४२ तास कामकाज झाले. मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर वाढलेल्या कथित जातीय दंगली, यूपीएससीशी संबंधित सी सॅट, महागाई, दुष्काळ, आंध्र प्रदेश विभाजन, महिलांवरील अत्याचार आदी लोकहिताच्या विषयांवर संसदेत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १३ विधेयके मंजूर करण्यात आली.
संसदेत विचारल्या गेलेल्या ५४० तारांकित प्रश्नांपैकी १२६ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.
सुमित्रा महाजन,लोकसभा अध्यक्ष
अर्थसंकल्पीय अधिवेशनात १३ विधेयके मंजूर
भाजपप्रणीत सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. एरव्ही निवडणुकीपूर्वी सतत बोलणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मौन झाले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament budget session ends