देशात मोदींची लाट नसल्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते अरुण जेटली यांनी मनमोहन सिंग यांची ‘लघुदृष्टी’ असल्याने त्यांना मोदींची लाट दिसत नसल्याची टीका आहे.
जेटली म्हणाले की, “देशात मोदींना मिळणारा पाठिंबा सर्व जनतेला दिसत असूनसुद्धा आपल्या सध्याच्या पंतप्रधानांना मात्र, मोदींची लाट दिसत नाही. त्यांची दृष्टी कमी असावी किंवा त्यांना दिसत असूनही जाहीररित्या मान्य करायची हिम्मत होत नसावी म्हणूनच मोदींना मिळणारा पाठिंबा त्यांना दिसत नाही.”
देशात मोदीलाट मुळीच नाही. ही केवळ प्रसार माध्यमांनी उठविलेली हवा आहे. देश कोणत्याही मोदी लाटेत वाहवणार नाही, असे मत गुरुवारी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार आज अरुण जेटली यांनी घेतला. तसेच “देशात पहिल्यांदा एखादे सरकार आपले अपयश लपवून प्रतिस्पर्ध्यांवर टीका करण्यात गुंतले आहे.” असेही जेटली पुढे म्हणाले.

Story img Loader