लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांचे प्रचार तसेच त्यांच्यासंबंधीच्या बातम्यांचाच जोर दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर वृत्तवाहिन्यांच्या ‘प्राइम टाइम’मध्ये आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे आघाडीवर राहिले आहेत. केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पिछाडीवर टाकल्याचे एका अभ्यासाद्वारे आढळून आले आहे. सीएमएस मीडिया लॅपतर्फे आज तक, एबीपी न्यूज, झी न्यूज, एनडीटीव्ही, सीएनएन आयबीएन या पाच अग्रणी वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या बातम्यांचा अभ्यास करण्यात आला. १ ते १५ मार्च या काळात या वृत्तवाहिन्यांवरील रात्री ८ ते १० दरम्यानच्या प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमांदरम्यान केजरीवाल यांना ४२९ मिनिटे (२८.१९ टक्के वेळ) मिळाली, तर नरेंद्र मोदींना ३५६ मिनिटे (२३.९८ टक्के वेळ), राहुल गांधी यांना ७२ मिनिटेच (४.७६ टक्के) तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३३ मिनिटे (२.२० टक्के)मिळाली. राजकीय पक्षांच्या बाबतीत भाजपला ३६९ मिनिटे, ‘आप’ला ३४५ मिनिटे व काँग्रेसला १९३ मिनिटे मिळाली.
संक्षिप्त :‘प्राईम टाईम’मध्ये केजरीवालना मोदी, राहुलपेक्षाही ‘टीआरपी’
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांचे प्रचार तसेच त्यांच्यासंबंधीच्या बातम्यांचाच जोर दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2014 at 03:35 IST
TOPICSराजकारणPoliticsलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political news in short