मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तस-तशी प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधला जोशदेखील कमालीचा वाढला आहे. उमेदवारांनी सभांचा धडाका लावला असून, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप होताहेत. मोठमोठ्या रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह उन्हातान्हात भटकत मतदार राजाला मत देण्यासाठी विनंती करीत आहेत. असे असले तरी पूर्वी रिक्षेतून फिरत ‘ताई, माई, अक्का…’ सारख्या दिल्या जाणाऱ्या पक्षाच्या घोषणा हल्ली कानावर पडत नाहीत. परंतु, अशाच धाटणीच्या चालू जमान्याच्या घोषणा सभांमधून नेत्यांच्या मुखातून ऐकायला मिळत असून, फेसबूक, टि्वटर आणि व्हॉट्सअप सारख्या सोशलमीडियाच्या मंचावर पाहायला मिळतात. निवडणुकीच्या काळात अशा अनेक वैविध्यपूर्ण घोषणा सोशल मीडियावर फिरत आहेत, यातील काही घोषणा वानगीदाखल खाली दिल्या आहेत, तुम्हालासुध्दा अशा काही घोषणा माहित असल्यास बातमीच्या खाली देण्यात आलेल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा, या सुविधेचा वापर करून येथे शेअर करा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा