तेलुगू चित्रपटसृष्टीतले दोन मेगास्टार असणाऱ्या भावांमध्ये राजकारण आडवे आले आहे. होय, मेगास्टार के चिरंजीवी आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणारा त्यांचा भाऊ के पवन कल्याण यांनी राजकारणात उतरून आपापले मार्ग चोखाळल्यामुळे कुटुंबामध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
तेलुगू तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणाऱ्या चिरंजीवी यांनी १९९९ मध्ये स्वत:च्या प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केली. मात्र २०११ मध्ये आपल्या पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करून केंद्रात स्थिरस्थावर झाले. मात्र सारे काही सुरळीत चालू असतानाच चिरंजीवी यांचे बंधू पवन कल्याण यांनी राजकारणात सक्रिय होऊन स्वतचा नवा पक्ष स्थापण्याची घोषणा केल्यामुळे दोघा भावांमधील तेढ निर्माण झाली आहे. पवन कल्याण येत्या शुक्रवारी नव्या जन सेना पक्षाची स्थापना करण्याची शक्यता आहे.
अभिनेत्या भावांना राजकारणाने वैरी बनविले
तेलुगू चित्रपटसृष्टीतले दोन मेगास्टार असणाऱ्या भावांमध्ये राजकारण आडवे आले आहे. होय, मेगास्टार के चिरंजीवी आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणारा
First published on: 14-03-2014 at 12:03 IST
TOPICSराजकारणPoliticsलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics made actor brothers enemy of each other