बिहारमध्ये काँग्रेससमवेत जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी जोरदार खंडन केले आहे. तथापि, लोकसभेच्या जागेची अदलाबदल करण्यास अथवा काँग्रेससाठी एक जागा अधिक सोडून आघाडी करण्यास आपण अद्यापही तयार असल्याचे लालूप्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि राजद यांच्यात समझोता झाल्याचे वृत्त आपण विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाहिले, मात्र त्यामध्ये तथ्य नाही. भाजपच्या समर्थक वाहन्यांनी अशा प्रकारचे वृत्त प्रक्षेपित केल्याचे लालूप्रसाद म्हणाले. काँग्रेसला ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा देण्याची तयारी आपण दर्शविली आहे, मात्र अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. जागेची अदलाबदल करण्यास किंवा काँग्रेसला एक जागा अधिक देण्यास आपण तयार आहोत, असेही लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे बिहारचे प्रभारी सी. पी. जोशी यांनी आपल्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली का, असे विचारले असता लालूप्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये काय चालले आहे त्याची आपल्याला कल्पना नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा