प्रियांका गांधी माझ्या मुलीसारख्या आहेत असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी म्हटल्यानंतर प्रत्युत्तरात प्रियांका गांधींनी, मी राजीव गांधी यांची मुलगी असल्याचे म्हटले आहे.
“प्रियांका गांधी मला मुलीसारखी आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्य करण्याची परंपरा नाही. प्रियांका या राहुल आणि सोनियांप्रमाणे माझी राजकीय विरोधक नाही.” असे मत मोदींनी दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. परंतु, हा संपूर्ण भाग वगळून केवळ प्रियांका गांधी मुलीसारख्या असल्याचेच वक्तव्य दाखविण्यात येत असल्याचा दावा मोदी समर्थकांनी केला आहे.
यावर अमेठीत राहुल गांधी यांच्या प्रचाररॅलीत व्यस्त असलेल्या प्रियांका गांधी आपल्या एसयूव्ही कारमधून जात असताना मोदींनी केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असता, सुरुवातीला त्यांनी उत्तर देणे टाळले त्यानंतर स्वत:हून पुढाकार घेऊन, ‘मी राजीव गांधींची मुलगी’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले व इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता त्या रवाना झाल्या.
मोदींच्या विधानावर पी.चिदंबरम यांनी निशाणा साधला, “मोदींनी प्रियांकांना मुलीसारखे मानले असेल, पण प्रियांका त्यांना पित्यासमान मानतील यात शंका आहे.” असे चिदंबरम यांनी म्हटले

Story img Loader