काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या जाहीर सभेत मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचप्रमाणे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या योजनांचे श्रेय मोदी लाटत आहेत, असेही गांधी म्हणाले.नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून राहुल गांधी यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली. मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांनाच स्थान दिले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.गुजरातमध्ये कोणत्या प्रकारची चौकीदारी सुरू आहे, शेतकऱ्यांकडून लाखो एकर जमीन बळकावून ती बडय़ा उद्योगसमूहांना दिली जात आहे. शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा आवाज दडपला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन लाटणे ही चौकीदारी आहे का, याला चोरी म्हणतात, चौकीदारी नाही, असेही ते म्हणाले.
‘मोदींनी शेतकऱ्यांची जमीन लाटली’
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या जाहीर सभेत मोदी यांच्यावरच हल्ला चढविला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-03-2014 at 01:50 IST
TOPICSराहुल गांधीRahul GandhiलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi accuses narendra modi of stealing farmers land