काँग्रेसची कोकणातील पहिली प्रचार सभा भिवंडीजवळील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सोनाळे गावी गुरुवारी आयोजित करण्यात आली होती़ बुधवारी सायंकाळपासूनच या भागातील उद्योग, व्यवसाय, दुकान चालकांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आपले व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले.  
सोनाळे गाव परिसरातील कंपन्या, पॉवर लूम, चहाच्या टपऱ्या, हॉटेल व्यवसाय, किराणा व इतर सर्व प्रकारची दुकाने गुरूवारी सकाळी राहुल गांधींच्या सभेचे व सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी बंद केले होते. हे व्यवसाय बंद करताना काँग्रेसच्या नेत्यांनी या व्यावसायिकांशी थेट संपर्क साधून होणारे नुकसान भरून देण्याची हमी घेतली असल्याची चर्चा या भागात सुरू होती. सभेला गर्दी होण्यासाठी या भागातील
परप्रांतीय कामगारांचा रोज बुडू नये म्हणून कामगारांना काही रक्कम देऊन त्यांना सभेसाठी येण्याचे आदेश लूम मालकांकडून देण्यात आले होते. सभेसाठी नाशिक, रायगड, जळगाव, भुसावळ, मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांना सुरूवातील पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागली.
दुपारी एक नंतर विविध भागातून व्होल्वो बस, वाहने सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन आल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. संध्याकाळी उशीरापर्यंत भिवंडी परिसरात मुख्य रस्ते, गल्ली बोळात वाहतूक कोंडी झाली होती.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा