महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचाराची पहिली सभा पुण्यात सोमवारी (३१ मार्च) होत आहे. ठाकरे यांची दुसरी सभा ६ एप्रिल रोजी होईल.
गुढीपाडव्याच्या दिवशी होणार असलेल्या प्रचारसभेत मनसेचे राज्यातील सर्व उमेदवार उपस्थित राहणार असून नदीपात्रात सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभा ६ एप्रिल रोजी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात येरवडय़ातील मोझे विद्यालय येथे सायंकाळी सात वाजता होईल.पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सकाळी शहराच्या विविध भागात पदयात्रा आयोजित करण्यात आली .

Story img Loader