शेतीचे अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना आत्महत्येप्रत नेणाऱ्या मराठवाडय़ातील गारपीटग्रस्त भागाचा तीन दिवसांचा दौरा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे आमदार मंगळवारपासून करणार आहेत.
या दौऱ्यात औरंगाबाद, बीड, जालना तसेच सिल्लोड आणि कन्नड येथील गारपीटग्रस्त भागाची पाहाणी राज करणार असल्याचे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले. आचारसंहितेच्या बंधनात न अडकता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आवाहन राज यांनी यापूर्वीच सरकारला केले असून मनसेच्या माध्यमातून कोणती मदत करता येईल, याची पाहणी राज करणार आहेत. मनसेचे आमदार वेगवेगळ्या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज घेतील आणि मनसेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही नांदगावकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray to visit hailstorm affected places