बेधडक वक्तव्य आणि कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपट अभिनेत्री राखी सावंत हिने शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर ‘‘वेळ पडल्यास राज ठाकरे यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवू आणि मुख्यमंत्री व्हायला आवडेल’’ असे सांगत ‘राज’कीय धमाल उडविण्यासाठी सज्ज असल्याचेच राखी सावंतने दाखवून दिले.
राखी सावंतने भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळावा यादृष्टीने भाजप कार्यालयास भेटही दिली होती. भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्याने राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करून राखीने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आणि मनसेचे महेश मांजरेकर यांच्याविरोधात लढविलेल्या निवडणुकीत राखी सावंतला केवळ १९९७ मते मिळाली होती. त्यानंतर शनिवारी राखीने रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला असून राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष अशी नेमणूकही झाली.
पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना ‘‘वेळ पडल्यास आपण राज ठाकरे यांच्या विरोधातही निवडणूक लढवू. तसेच मुख्यमंत्री व्हायला आपल्याला आवडेल अशी ‘बिनधास्त’ भूमिका राखीने मांडली.ं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा