अयोध्येत राम मंदिर बांधणे, ३७० कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा आणणे या भाजपच्या जाहीरनाम्यातील तीन मुद्दय़ांना आपल्या पक्षाचा विरोध राहील, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. भाजपने हे वादग्रस्त मुद्दे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) अजेंडय़ावर आणून नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्रात अनेक पक्षांचे मिळून एनडीएचे सरकार येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारच्या अजेंडय़ातून वादग्रस्त मुद्दे काढण्यात आले होते. त्याचप्रमाणे भाजपने जरी आपल्या जाहीरनाम्यात हे मुद्दे घातले असले, तरी एनडीएच्या अजेंडय़ावर या मुद्यांचा समावेश करू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.