केंद्रात गृहमंत्री म्हणून व्हायला आवडेल, असे रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महायुतीच्या येथील चंदनझिरा भागात आयोजित जाहीर सभेनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले म्हणाले की, निवडणुकांचा निकाल लागायचा असला, तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान मात्र होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री व्हायला आपणास आवडेल. उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे त्यासाठी आपली शिफारस करतील, असा विश्वास आहे.
काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे दिल्लीतील घरातील माझे सामान बाहेर काढण्यात आले होते. आता आपण काँग्रेसलाच सत्तेच्या बाहेर काढू, असा टोलाही त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा