लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांशी युती करूनही रिपब्लिकन पक्षाच्या गटांची धुळधाण झाली. त्यामुळे आंबेडकरी समाजात प्रचंड अस्वस्थता असून, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना एकत्र करून एक पर्यायी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने शिवसेना-भाजपबरोबर  युती केली होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली.  प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पर्यायी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यासाठी राजाराम खरात, दिलीप जगताप, सुनील खांबे आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुंबई, पुणे, ठाणे इत्यादी ठिकाणी बैठक घेण्यात आल्या.

Story img Loader