राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पावणेपाच वर्षे धर्मनिरपेक्ष राहातात आणि निवडणुकीच्या तोंडावर जतीयवादी बनतात असा जोरदार हल्ला भाजपनेते प्रकाश जावडेकर यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जातीयवादी ठरविण्याचा त्यांचा आवडता उद्योग असून राजीनामा देऊन मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग भाजपमध्ये आल्यामुळे त्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्याचा टोलाही जावडेकर यांनी हाणला.
सत्यपाल सिंग यांनी पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांनी भाजपला जातीयवादी ठरवत सत्यपाल सिंह यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना महत्वाची पदे देताना काळजी घेतली पाहिजे असे विधान शनिवारी केले. याबाबत बोलताना जावडेकर म्हणाले, विदेशीच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विरोध करणारे पवार हे गेले दशकभर काँग्रेसच्या मांडली मांडी लावून बसले आहेत़  त्यांच्या खरा चेहरा महाराष्ट्राला परिचित असल्यामुळे त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

Story img Loader