दोनदा मतदानाचा सल्ला दिल्याने निवडणूक आयोगाकडे खुलासा करण्याची वेळ आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे १९९१ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रचारामुळेही अडचणीत आले होते. तेव्हा तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीतील गैरमार्गाबद्दल पवार यांच्यावर ताशेरे ओढले होते.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात काँग्रेसचे यशवंतराव गडाख यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढलेले बाळासाहेब विखे-पाटील यांच्यात लढत झाली होती. विखे-पाटील यांनी जनता दलाला ५० लाख रुपयांची मदत केली असून, नगरमधील जनता दलाच्या उमेदवाराने अन्यत्र लढावे म्हणून २० लाख रुपये दिले. तसेच विखे-पाटील यांचे निवडणूक चिन्ह सायकल असल्याने मतदारसंघात त्यांनी सायकली वाटल्या. असे अनेक आरोप करण्यात आले होते.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवी मुंबईतील मेळाव्याबद्दल केलेल्या विधानवरून शरद पवार यांच्यावतीने उद्या खुलासा सादर केला जाईल, असे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

 

Story img Loader