शिवसेना-भाजप युती भक्कम असून लोकसभा निवडणूकच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूकही महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला असला तरी जेथे मनसेचा उमेदवार महायुतीच्या विरोधात लढेल तेथे भाजप ताकदीने त्यांना विरोध करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची घोषणा जरी राज यांनी केली असली तरी लोकसभा निवडणूक लढविण्याचीही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मनसे जर महायुतीविरोधात उमेदवार देऊन लढणार असेल तर ती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मदतच ठरेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळेच काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याची विनंती केली होती. राज यांनी उमेदवार जाहीर केल्यामुळे आता ज्या ठिकाणी मनसे शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात लढेल तेथे भाजप सर्वशक्तिनिशी शिवसेनेला मदत करेलस असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि भाजपमध्ये राज यांच्या भूमिकेवरून कोणतेही गैरसमज नाही. उलट युती अधिक मजबूत झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा