बंडखोर खासदार आनंद परांजपे यांना धुळ चारण्याचे बेत आखत कल्याणच्या मोहीमेवर जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवाला उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना नेतृत्वासाठी तापदायक ठरु लागली असून शिंदे यांच्या मदतीसाठी ठाण्याहून शिवसैनिकांची खास रसद कल्याणच्या दिशेने दररोज कूच करु लागल्याने शिवसेनेच्या ठाण्याच्या गडावर सध्या शुकशुकाट पसरला आहे. ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तटबंदी मजबूत मानली जात असली तरी सेनापतीच रात्रं-दिवस कल्याणमध्ये अडकल्याने ठाण्याची मोहीम चालवायची कुणी, असा प्रश्न येथील शिवसैनिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, ठाणे की कल्याण अशा दुहेरी कोंडीत शिवसैनिक सापडला असताना या घडामोडींमुळे चिंताग्रस्त झालेले येथील उमेदवार राजन विचारे यांनीही आपली अस्वस्थता ‘मातोश्री’वर व्यक्त केल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
कल्याणमध्ये आनंद परांजपे यांचा पाडाव करण्यासाठी स्वत एकनाथ शिंदे यांनी िरगणात उतरावे, असा ‘मातोश्री’चा आग्रह होता. मात्र, ठाण्याच्या राजकारणात रमलेले िशदे दिल्लीचे विमान पकडण्यास तयार नव्हते. ‘मातोश्री’चा दबाव झुगारणे जवळपास अशक्य बनल्याने अखेर िशदे यांनी कल्याणमधून आपल्या मुलाला िरगणात उतरवण्याचे मान्य केले, मात्र हीच खेळी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. कल्याणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद चांगली आहे. त्यामुळे परांजपे यांच्याविरोधातील लढाई कठीण जाणार नाही आणि ठाण्यातही पुरेपूर लक्ष घालता येईल, असे शिंदे समर्थकांना सुरुवातीला वाटत होते. मात्र, या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमदार रमेश पाटील यांचे बंधू राजू यांना उमेदवारी दिली आणि िशदे यांच्यापुढील आव्हान तगडे बनले. आगरी समाजातील राजू पाटील सध्या पुर्ण ताकदीनिशी िरगणात उतरल्याने िशदे यांना कल्याणमधून हलणेही कठीण बनले आहे.
सेनापतीसह मावळेही कल्याणमध्येच
दरम्यान, ही निवडणुक एकनाथ िशदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि तितकीच भावनिक बनल्याने त्यांचे ठाण्यातील जवळचे समर्थक दररोज कल्याणवारी करु लागल्याने राजन विचारे यांची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे. बुधवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे भरलेल्या कॉग्रेस आघाडीच्या मेळाव्यात काही वक्त्यांनी या मुद्दयांची जाहीर वाच्यता करत ‘सेनापती अडकल्याने ठाणे सोपे झाले आहे’, अशी बोलकी वक्तव्य केली. ठाण्यातून नरेश म्हस्केंसह काही महत्वाचे पदाधिकारी कल्याणमध्ये अडकल्याने ठाण्याची मोहीमेवर विचारे एकटे पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा