महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली  ठरेल, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे शिवसेना सुखावली आहे. निवडणुक प्रचारासाठी महाराष्ट्रात सभा घेणाऱ्या मोदी यांनी आतापर्यंत बाळासाहेबांचे नाव घेण्याचे टाळल्यामुळे सेना नेत्यांमध्ये कामालीची नाराजी होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या महागर्जना सभेत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांचे नावही न घेतल्यामुळे सेनानेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अखेर अमरावतीच्या सभेत मोदींनी बाळासाहेबांची आठवण काढत मतांचा जोगवा मागितल्यामुळे त्यांनी शिवसैनिकांची मने जिंकली आहेत. आता एकदिलाने सेना-भाजप लढताना दिसेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Story img Loader