सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी माजी केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडत एम्सचे न्यायवैद्यक विभाग प्रमुखांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सुधीर गुप्ता यांनी केला होता. ते कुणाच्या विरोधात काहीही बोलू शकतात अशा शब्दात आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी असा मुर्खपणाचा विचार तरी करू शकेन काय असा सवाल आझाद यांनी विचारला. गुलाम नबी आझाद काय आहेत हे देशाला माहित आहे अशी टिप्पणी आझाद यांनी केली. गुप्तांच्या विश्वासार्हतेबाबत तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. ते काहीही बोलू शकतात अशी टीका आझाद केली. सुनंदा पुष्कर यांचा शवविच्छेदन अहवाल तयार करताना गुप्ता त्या पथकाचे प्रमुख होते. एम्सने गुप्ता यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा या १७ जानेवारी रोजी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या
होत्या.

Story img Loader