विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. पैशांचा खेळ टाळण्याकरिताच विरोधकांनी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या भूमिकेवरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना-भाजप युतीचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तीन उमेदवार निवडून येण्याची क्षमता असताना भाजप आणि शिवसेना या दोघांनीही प्रत्येकी दोन असे चार उमेदवार उभे केल्याने चुरस वाढली. पहिल्या फेरीत निवडून येण्याकरिता २९ मतांची आवश्यकता आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याकरिता अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे.

उमेदवार
काँग्रेस – शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रवादी – हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर भाजप – विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर शिवसेना – निलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर

Story img Loader