केंद्रातील संपुआ शासनाच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका करीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी,  नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायल़े  
मोदी पंतप्रधान झाल्यास केवळ सत्ताबदल होणार नसून शासनाचा चेहरामोहराच बदलेल, असे सिन्हा या वेळी म्हणाल़े  एमडीएमकेने मानवाधिकार या विषयावर आयोजित केलेल्या चर्चेत सिन्हा यांनी हे मत मांडल़े  अरुणाचल प्रदेशमधील मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत सिन्हा म्हणाले की, चीनने विस्तारवादी भूमिका सोडावी, असे ठणकाविण्याची हिम्मत केवळ मोदींनीच दाखविली होती़  असे धर्य आणि निश्चय आम्ही सत्तेत आल्यावरही दाखवू़  श्रीलंकेकडून पकडण्यात येणाऱ्या तामिळ मासेमारांच्या प्रश्नावरही या वेळी सिन्हा यांनी भाष्य केले.

Story img Loader