केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी आंध्र प्रदेशमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. या वेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि भाजप व तेलुगु देसम पक्षाचे अनेक नेते उपस्थित
होते.
तेलुगु देसम पक्ष एनडीएचा घटक पक्ष असून त्या पक्षाने सीतारामन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. आंध्र प्रदेशातील विरोधी वायएसआर काँग्रेस ही निवडणूक लढविणार नसल्याने सीतारामन या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आंध्र प्रदेशात १७५ जागांच्या विधानसभेत तेलुगु देसम आणि भाजप आघाडीकडे १०७ मते आहेत.