भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा पक्षावरील प्रभाव वाढल्याच्या वृत्ताचा ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी खंडन केले आहे. पक्षापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसल्याचे स्पष्ट करीत जेव्हा २००२ मधील गुजरात दंगलीनंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांनी मोदींनी मुख्यमंत्रिपद सोडावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्या वेळी पक्षाच्या इतर सर्वच नेत्यांनी एकत्रितपणे वाजपेयींच्या भूमिकेचा विरोध केला. त्यामुळे भाजपमध्ये पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असेच व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या कोणत्याही नेत्याला मोदींची भीती वाटत नाही. मोदी आमचे सहकारी असून लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. भाजपमध्ये अध्यक्ष नेतृत्व करतो. मात्र संघटना निर्णय घेते, असेही व्यंकय्या नायडू यांनी द इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Story img Loader