प्रियंका यांनी आता सभ्यतेची लक्ष्मण रेषा ओलांडली असल्याचे म्हणत वरूण गांधी यांनी प्रियंका यांच्या मार्ग भरकटल्याच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
वरूण गांधी म्हणाले की, “गेल्या दशक भरात माझ्या कुटुंबातील व्यक्ती असो किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असो..मी माझ्या भाषणांमध्ये केव्हाही मर्यादा ओलांडली नाही. आज माझ्या मार्गाबद्दल वक्तव्य केली जात आहेत. परंतु, मी नेहमी माझ्या मार्गापेक्षा देशाच्या विकासाच्या मार्गावर लक्ष ठेवत आलो आहे. आतापर्यंत माझ्यापरिने जसे होईल त्यापद्धतीने मी देशासाठी काम करत आलो आहे. मी माझ्या आयुष्याकडे अर्थपूर्ण पद्धतीने पाहतो. त्यामुळे मार्ग भरकटल्याची टीका करून त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली आहे.”असेही ते म्हणाले.
प्रियांका गांधी यांनी अमेठीमध्ये, शेजारच्या सुलतानपूर मतदारसंघात भाजपला मते देऊ नका, तेथे माझा चुलत भाऊ वरुण गांधी उभा आहे तो माझ्या कुटुंबातला आहे पण तो भरकटलेल्या मार्गाने चालला आहे. जर कुटुंबातील तरुण मुलगा चुकीचा मार्ग निवडत असेल तर घरातील थोरामोठय़ांनी त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे तुम्ही सर्वानी माझ्या भावाला खरा मार्ग दाखवा. असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेत वरूण गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा