आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे चित्रवाणीवरील मुलाखतीमधील एखादा भाग वारंवार दाखवा, अशी सूचना वृत्तनिवेदकाला करत असल्याची चित्रफीत यू-टय़ुबवर प्रेक्षकांचे आकर्षण ठरली आहे.
एक मिनिटाच्या या चित्रफितीमध्ये केजरीवाल मुलाखतीमधील काही भागांवर भर द्या, असे वृत्तनिवेदकाला सांगत आहेत. वृत्तनिवेदकाने त्याला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही मुलाखत घेण्यात आली. आपल्या विरोधात माध्यमे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर ही चित्रफीत बाहेर आली आहे. दिल्लीत मुख्यमंत्रिपदानंतर मोठे घर घेतल्याचे वृत्त माध्यमांनी वारंवार दाखवले, मात्र गुजरातमध्ये मोदींनी शेतकऱ्यांची जमीन उद्योगपतींना दिल्याची दखलही घेतली नाही, असा केजरीवालांचा आरोप होता.

Story img Loader