मंत्रिमंडळातून बाहेर होताच डॉ. विजयकुमार गावित यांनी आपली मुलगी व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हिना हिचा भाजपच्या खुल्या व्यासपीठावरुन प्रचार सुरु केला आहे. डॉ. गावित यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळताना कॉग्रेसची जातीभेद करून दुफळी माजवणारा पक्ष अशी संभावना केली.भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळविणाऱ्या हिना यांची स्वागत फेरी आणि सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा विरोध झुगारुन डॉ. विजयकुमार गावित यांनी सहभाग घेतला. हिना यांच्या भाजप प्रवेशामुळे विजयकुमार गावित यांची राष्ट्रवादीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.  कारवाईची तमा न बाळगता त्यांनी आपल्या कन्येचा प्रचार सुरु केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijaykumar gavit praises modi