काँग्रेसने आज(मंगळवार) लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात देशभरातून एकूण ५० जणांची विविध मतदार संघांसाठी नावे घोषित करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या पुणे मतदार संघाचा तिढा मार्गी लागला असून काँग्रेसने सुरेश कलमाडींना बगल देत यावेळी पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच चंद्रपूर मतदार संघासाठी संजय देवतळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पालघरमधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाली तसेच लातूर मधून दत्तात्रय बनसोड यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. नांदेड, औरंगाबादबद्दलचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.
दिल्ली चांदणी चौकातून कपील सिब्बल रिंगणात उतरणार आहेत, तर नवी दिल्लीतून अजय माकन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच अजमेरमधून सचिन पालयट यांना तिकीट मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा