लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षण मतदार संघात येत्या २० जून रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी आचाररंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, ज्या मतदारसंघात ही निवडणूक होत आहे त्या मतदारसंघापुरताच आचारसंहिता लागू असेल.
  नितीन गडकरी (नागपूर पदवीधर मदार संघ), वसंत खोराटे (अमरावती शिक्षक मतदार संघ), भगवान साळुंखे (पुणे शिक्षक मतदार संघ), चंद्रकांत पाटील (पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघ) आणि सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर मतदार संघ) यांचा कार्यकाल संपत आहे. रिक्त होणाऱ्या पाच जागांसाठी बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ जून ही उमेदवारी अर्ज दाखल  करण्याचा अखेरचा दिवस असेल. २० जूनला मतदान तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खास प्रतिनिधी, मुंबई</p>

खास प्रतिनिधी, मुंबई</p>