वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात चळवळ उभी करण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यात भाजप मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येणार नाही, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
सत्तेवर आल्यानंतर एका महिन्यातच सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वढ केली, इतकेच नव्हे तर रेल्वेच्या आणि मालवाहतुकीच्या दरातही वाढ केली. भाजपने निवडणुकीपूर्वी अनेक गोष्टी सांगितल्या, मात्र सत्तेवर आल्यावर ते बरोबर त्या गोष्टींच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे आम्ही या विरोधात चळवळ उभारणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.
येथे जातीयवादी पक्षाला थारा नाही, दोन जागांवर विजय मिळविल्यानंतर त्यांनी मोठा प्रचार केला आणि अनेक असत्य गोष्टी सांगितल्या. पुढील निवडणुकीत त्या पक्षाला या दोन जागाही मिळणार नाहीत, असा दावाही बॅनर्जी यांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा