दरवर्षी राज्यात १५ हजार कृषी पदवीधर कृषी विद्यापीठातून बाहेर पडतात. त्यापकी बहुतेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. काही खासगी क्षेत्रात नोकऱ्या करतात, तर काही कृषी सेवा केंद्र किंवा अन्य व्यापार उद्योगात उतरतात. नाइलाजाने काहींना शेती करावी लागते. लाखोंच्या संख्येने कृषी पदवीधर असूनही शेतकऱ्यांना मात्र मार्गदर्शन करणारे थोडेच असतात. त्यामुळे कृषी साक्षरतेत आजही राज्य मागे आहे. असे असले तरी कर्तव्यभावनेतून सोशल मीडियाचा प्रभावीरीत्या वापर करून काही विद्यार्थी हे काम करीत आहेत. ‘अन्नदाता सुखी भव:’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘होय आम्ही शेतकरी’ या नावाने फेसबुक पेज व व्हॉटस्अॅप ग्रुप त्यांनी बनविला आहे. वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी करणारे पाच कृषिविशारद व प्रगतशील शेतकऱ्यांनी हे काम नि:स्वार्थी वृत्ती ठेवून व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून विनामूल्य चालविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा