* २०१६-१७ या वर्षांच्या रब्बी हंगामाकरीत हरयाणा सरकार ७५ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करणार आहे.
* गव्हाच्या खरेदीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती अन्न व वितरण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली.
* धान्याची खरेदी करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना ४८ ते ७२ तासांत पैसे देण्यात येणार आहेत.
* त्यामुळे या वर्षी हरयाणातील बाजारात ७५ लाख मेट्रिक टन गहू येणे अपेक्षित आहे.
* या गव्हाचा प्रतिक्विंटल १ हजार ५२५ असा भाव असेल. तसेच, हा गहू हरयाणातील विविध भागांतील बाजारपेठेत उपलब्ध होईल.
केंद्र सरकार देशात ५ लाख शेततळी बांधणार
* देशातील भूजल पातळी घटत असल्यामुळे देशभर केंद्र सरकार ५ लाख शेततळी बांधणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली.
* शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, फार्मर्स अॅप नावाचे उपयोजन वापरावे, खतांचा वापर कमी करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहनही मोदी यांनी केले.
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील पिके जळाली
* ग्रामीण भागातील दुष्काळाची धग वाढली असून पाण्याअभावी महाराष्ट्राच्या विविविध भागांतील पिके जळाली आहेत.
* पाणीपातळी खालावल्याने मका, कांदा, भुईमुग आदी पिके करपली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2016 रोजी प्रकाशित
कृषीवार्ता : रब्बी हंगामासाठी हरयाणा सरकारकडून गव्हाची खरेदी
२०१६-१७ या वर्षांच्या रब्बी हंगामाकरीत हरयाणा सरकार ७५ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-03-2016 at 00:55 IST
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana government to buy wheat in rabi season