* २०१६-१७ या वर्षांच्या रब्बी हंगामाकरीत हरयाणा सरकार ७५ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करणार आहे.
* गव्हाच्या खरेदीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती अन्न व वितरण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली.
* धान्याची खरेदी करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना ४८ ते ७२ तासांत पैसे देण्यात येणार आहेत.
* त्यामुळे या वर्षी हरयाणातील बाजारात ७५ लाख मेट्रिक टन गहू येणे अपेक्षित आहे.
* या गव्हाचा प्रतिक्विंटल १ हजार ५२५ असा भाव असेल. तसेच, हा गहू हरयाणातील विविध भागांतील बाजारपेठेत उपलब्ध होईल.
केंद्र सरकार देशात ५ लाख शेततळी बांधणार
* देशातील भूजल पातळी घटत असल्यामुळे देशभर केंद्र सरकार ५ लाख शेततळी बांधणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली.
* शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, फार्मर्स अ‍ॅप नावाचे उपयोजन वापरावे, खतांचा वापर कमी करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहनही मोदी यांनी केले.
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील पिके जळाली
* ग्रामीण भागातील दुष्काळाची धग वाढली असून पाण्याअभावी महाराष्ट्राच्या विविविध भागांतील पिके जळाली आहेत.
* पाणीपातळी खालावल्याने मका, कांदा, भुईमुग आदी पिके करपली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana government to buy wheat in rabi season