Diwali faral recipe 2023: संपूर्ण देशभरात दिवाळीच्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का… असा प्रश्न पडू लागला आहे. अनेक महिलांच्या दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या नेहमी नरम पडतात. पण आता घाबरू नका आधी ही माहिती वाचा. खाली दिलेलं भाजणीचे योग्य प्रमाण वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली. दिवाळीला सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे चकली पण काही वेळा चकली बिघडते कारण भाजणीचे प्रमाण योग्य नसते कोणतातरी पदार्थ जास्त होतो म्हणून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भाजणीचे योग्य प्रमाण वापरून खमंग खुसखुशीत चकलीकशी बनवायची

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चकली भाजणी साहित्य

  • ३ वाट्या साधे तांदूळ
  • दीड वाटी हरभऱ्याची डाळ
  • १ वाटी उडीद डाळ
  • अर्धी वाटी मूग डाळ
  • १ वाटी पोहे
  • पाऊण वाटी धणे
  • २ टेबल स्पून जिरे

चकलीची भाजणी कशी करायची?

  • सर्वात आधी वर दिलेले सर्व धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत.
  • सर्वपर्थम तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजू नयेत. किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा.
  • हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी. त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी. साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा.
  • मग मूगडाळ भाजावी. त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत. पोहे भाजणं अर्ध्यावर आले असतानाच त्यात धणे टाकावेत. थोडावेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावेत.
  • भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात २ टेबलस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी. या भाजणीत ४० ते ५० मध्यम आकाराच्या चकल्या होतात.

कुरकुरीत चकलीची रेसिपी

  • सुरुवातीला २ वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली करुयात.
  • एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, अर्धा टेबलस्पून तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून ओवा, १ टेबलस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, २ टीस्पून तूप टाकावे. या पाण्याला उकळी आली की २ वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी.
  • गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर हे १ तासभर झाकून ठेवावे. तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात तो मऊसर भिजवून घ्यावा.
  • चकली करण्याचं यंत्र म्हणजेच सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं. त्यात हे तयार केलेलं पीठ टाकावं. मध्यम आकाराच्या चकल्या बटरपेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात.

हेही वाचा >> ढाबा स्टाईल सोया चाप मसाला; बोट चाटत रहाल अशी चमचमीत रस्सेदार सोयाबीन मसाला भाजी

  • त्यानंतर कढईत तेल घ्यावं. भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्यात चकली तळून घ्यावी. दोन वाटी मिश्रणात साधारण १५ ते १६ चकल्या आरामात होतात.
मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakali bhajani recipe in marathi diwali faral in marathi diwali 2023 srk