आनंद आणि उत्साहाचे रूप म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे दिवाळी. अवघ्या काही दिवसांवर हा सण आला आहे. यासाठीची लगबगही आता सुरु झाली आहे. घरोघरी साफसफाईचे काम आता पूर्ण होत आले आहे, त्याचबरोबर फराळाचा घमघमाटही सुटू लागला आहे. यंदा २२ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु होणार आहे. २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाईल. मात्र, धनत्रयोदशीचा सण साजरा का तुम्हाला माहित आहे का? आज आपण याविषयी रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

एका पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. हिंदू धर्मात धन्वंतरी विष्णुचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णुंनी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरीचा अवतार धारण केला होता.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Vishwa hindu parishad
“आजारातून मुक्त होण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न”, ख्रिसमस कार्यक्रम हिंदू संघटनांनी उधळला!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

Diwali 2022 : २२ की २३, नक्की कोणत्या दिवशी साजरी होणार धनत्रोयदशी? ‘या’ वस्तूंची खरेदी मानली जाते अशुभ

भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशीच धनत्रोयदशी साजरी केली जाते. याव्यतिरिक्त अन्य कारणांनीदेखील धनत्रयोदशी साजरी केली जाते. कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धन्वंतरीचा जन्म झाला होता यामुळे ही तिथी धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकट झाले असल्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी नवीन खरेदी केल्याने धनामध्ये १३ पट वाढ होते अशी मान्यता आहे. देवतांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीना वैद्यशास्त्राचे देव मानले जाते. यादिवशी घराबाहेर आणि आंगणात दिवे लावण्याचीदेखील प्रथा आहे.

या दिवशी सोने अथवा चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. आपल्यावर धनाची कृपा व्हावी म्हणून या दिवशी अनेकजण भांडी आणि दागिन्यांची खरेदी करतात. धातूमुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होत असल्याचे म्हटले जाते. एवढेच नाही तर धातूमधून निर्माण होणारी तरंग लहरी थेराप्यूटिक प्रभाव निर्माण करतात. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चादी खरेदीची परंपरा पुर्वापार चालत आली आहे. केवळ सोने अथवा चांदीच नव्हे तर या दिवशी अन्य वस्तूंचीदेखील खरेदी केली जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader