सणासुदीच्या काळात प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यासाठी आपण पार्लरमध्ये फेशियल आणि इतर सर्व काही करून घेतो. परंतु, मेकअपसाठी खूप वेळ पार्लरमध्ये जाणे शक्य नसते. त्यामुळे अनेक महिला घरीच मेकअप करतात. दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही घरी मेकअप करणार आहात का? तसे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत; ज्या फॉलो करून तुम्ही घरीच मेकअप करून सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसू शकता.
मेकअपमध्ये लेअरिंग खूप महत्त्वाचे असते. लेअरिंग योग्य पद्धतीने झाल्यास पुढील मेकअप नीट करता येतो. लेअरिंग म्हणजे तुम्ही कोणत्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर कसा करायचा याचा क्रम. मेकअपचे विविध प्रॉडक्ट्स वापरण्याचा क्रम योग्य असल्यास तुम्ही चांगल्या प्रकारे मेकअप करू शकता.
दिवाळीत सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या मेकअप स्टेप्स
१) सर्वप्रथम मेकअपसाठी चेहरा नीट स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर तुम्ही सीरम, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीनचा वापर करा. मग मेकअप प्रॉडक्टचा वापर करा; ज्यात प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर, लिक्विड ब्लश, हायलायटर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.
२) आता शेवटी मेकअप सेट करण्यासाठी पावडर वापरून, ते सील करण्यासाठी मेकअप सेटिंग मिस्ट वापरा. पण, यातील एकही स्टेप तुम्ही गाळलीत; जसे की त्वचेवर मॉइश्चरायझर न लावणे किंवा आधी पावडर लावणे, तर तुमचा मेकअप खूप खराब दिसू शकतो. त्यामुळे लेअरिंगबाबत काळजी घ्या. चला तर मग जाणून घेऊ मेकअप लेअरिंग कसे करायचे ते?
३) सर्वप्रथम मेकअप बेस खूप स्मूद असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्वचा हायड्रेट करा. तुमचा चेहरा मेकअपसाठी रेडी करताना प्रथम तुमचा चेहरा हलक्या क्लिंजरने धुऊन घ्या. आता टोनर आणि मॉइश्चरायझरचा वापर करा.
४) आता स्मूद मेकअप बेससाठी प्रथम चेहऱ्यावर प्रायमर लावा; जेणेकरून मेकअप तुमच्या त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाही.
५) त्वचेच्या रंगानुसार स्किन करेक्टर निवडा आणि त्यावर फाउंडेशन लावणे टाळा; त्याऐवजी कन्सीलर लावा आणि ब्लेंड करण्यासाठी फाउंडेशन लावा. फाउंडेशनही नेहमी तुमच्या त्वचेच्या रंगाशी मॅच असणारे हवे.
६) ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा स्पंजचा वापर करा. चेहऱ्यावर डाग किंवा डार्क सर्कल असतील, तर ते कन्सिलरच्या मदतीने लपवा. डार्क सर्कलसाठी हलक्या रंगाचे कन्सिलर वापरा.
७) आता फाउंडेशन आणि कन्सिलर सेट करण्यासाठी सेटिंग पावडर वापरा. त्यामुळे मेकअप बराच वेळ सेट राहील. आता गालावर ब्लश लावा. ब्लश नेहमी खालून वर लावत जायचा. त्यानंतर डोळ्यांवर आयलायनर आणि पापण्यांवर मस्करा लावा.
८) तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिक्विड, पेन्सिल किंवा जेल आयलायनर लावू शकता. सर्वात शेवटी ओठांना लिपस्टिक किंवा लिपग्लॉस लावा. तुमच्या ओठांच्या रंगाशी जुळणारी लिपस्टिक निवडा. मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रेसह मेकअप लॉक करा.