दिव्यांचा आणि आनंदाचा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अनेकजण फराळ, साफसफाईच्या कामात व्यस्त आहेत. १२ नोव्हेंबरपासून दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. या सणानिमित्त घराघरात विद्युत रोषणाई, रांगोळ्या काढणे, नवीन कपडे घालणे आणि फटाके फोडले जातात.

पण, या सणादरम्यान फटाक्यांमुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे. देशातील अनेक राज्ये आणि शहरांमध्ये दिवाळीच्या दिवशी आणि त्यानंतरही हवेच्या गुणवत्तेत मोठी घट होत असल्याचे दरवर्षी दिसून येते. बहुतेक शहरांमध्ये दिवाळीच्या दिवसांत धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते. अशा परिस्थितीत वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आता अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक आणि ध्वनीविरहित दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे यंदा तुम्हालाही फटाके फोडायचे असतील तर तुम्हीही पर्यावरणपूरक फटाके( ग्रीन आणि इकोफ्रेंडली फटाके) हा एक चांगला पर्याय असू शकतो. जाणून घ्या या पर्यावरणपूरक फटक्यांबद्दल…

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा

पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय?

पारंपरिक घातक फटाक्यांना पर्यावरणपूरक फटाके एक सुरक्षित पर्याय आहेत. CSIR-National Environmental Engineering Research Institute (CSIR NEERI) संस्थेद्वारे हे फटाके तयार केले जातात. पारंपरिक फटक्यांच्या तुलनेत त्यातून कमी कार्बन सोडतात आणि सौम्य असतात.

पारंपरिक फटाक्यांप्रमाणे पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये ‘ऑक्सिडायझर्स’चा वापर केला जातो. पण, ‘मल्टीफंक्शनल अ‍ॅडिटिव्हज’मुळे हे फटाके वेगळे ठरतात. या फटाक्यांमधून घातक घटकाचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते.

पारंपरिक फटाक्यांमध्ये ॲल्युमिनियम, बॅरियम, पोटॅशियम, नायट्रेट आणि कार्बन या घटकांचा वापर केला जातो. पण, पर्यावरणपूरक फटाके बनवण्यासाठी हे पदार्थ वापरले जात नाहीत. तसेच हे फटाके जाळल्याने पाण्याची वाफ तयार होते. तसेच हे फटाके ११० ते १२५ डेसिबलदरम्यान आवाज निर्माण करतात; तर पारंपरिक फटाके सुमारे १६० डेसिबल आवाज निर्माण करतात, ज्यामुळे ते पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत जवळपास ३० टक्के कमी आवाज करतात.

पर्यावरणपूरक फटाके (ग्रीन क्रॉकर्स) कसे ओळखायचे?

पर्यावरणपूरक फटाके CSIR-NEERI आणि PESO च्या विशिष्ट हिरव्या रंगाचा लोगो आणि क्विक रिस्पॉन्स (QR) कोडद्वारे ओळखले जाऊ शकतात. हे पर्यावरणपूरक फटाके तीन श्रेणीत ओळखले जातात.

१) SWAS (सेफ वॉटर रिलीझर): ते धूळ कमी करण्यासाठी पाण्याची वाफ वातावरणात सोडते. ते ३० टक्के कमी कण उत्सर्जित करते आणि त्यात सल्फर किंवा पोटॅशियम नायट्रेट नसते.

स्टार (सेफ थर्माइट क्रॅकर): यात पोटॅशियम नायट्रेट किंवा सल्फर नसतात, कमी कण उत्सर्जित करतात आणि आवाजाची तीव्रता कमी करतात.

SAFAL: यात ॲल्युमिनियमचा कमीत कमी आणि मॅग्नेशियमचा जास्त वापर केला जातो. हे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी आवाज निर्माण करतात.

या तीन प्रकारात पर्यावरणपूरक फटाके मिळतात, पण हे फटाके रस्त्यावरील विक्रेत्यांकडून घेण्याऐवजी अधिकृत स्टोअरमधून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. हे फटाके फोडण्यासाठी एक लांब मेणबत्ती किंवा फुलझडीचा वापर करा. शरीरापासून एका हाताचे अंतर ठेवून मगच हे फटाके फोडावेत.

Story img Loader