Diwali Recipe : दिवाळीनिमित्त घराघरात गोडाचे पदार्थ बनवले जातात, खाल्ले जातात. यात फराळाबरोबर हल्ली अनेकजण मिठाई आणतात. मिठाईतील काजू कतली हा प्रकार अनेकांना फार आवडतो. यामुळे अनेकांच्या घरी आपल्याला काजू कतली पाहायला मिळते. पण काजू महाग असल्याने काजू कतलीचा दरही जास्त असतो. त्यामुळे यंदा मार्केटमधून काजू कतली विकत घेण्यापेक्षा घरच्या- घरी शेंगदाणा कतली बनवा. शेंगदाण्यापासून बनवी जाणारी शेंगदाणा कतलीची चव अगदी काजू कतलीसारखीच असते. कमी खर्चात, कमी वेळेत होणारी शेंगदाणा कतली बनवायची कशी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

१) शेंगदाणे – १ वाटी
२) दूध पावडर – २ चमचे
३) साखर – १ वाटी
४) पाणी – १/२ ग्लास
५) साजूक तूप – १- २ चमचे

कृती

शेंगदाणा कतली बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. कढईत शेंगदाणे हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यानंतर ताटात काढून चोळून सर्व सालं काढून टाका.

शेंगदाण्याची सालं काढल्यानंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. बारीक झाल्यावर चाळणीतून पावडर गाळून एका मोठ्या भांड्यात ठेवा. आता शेंगदाणा पावडरमध्ये मिल्क पावडर घाला आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा.

गोडपणासाठी साखरेचा पाक तयार करा. यासाठी कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालून चांगल उकळू द्या. पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि मिल्क पावडरचे मिश्रण घाला, आता एका पॅनमध्ये हे सर्व मिश्रण घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा. मिश्रण सतत ढवळत राहा आणि गोळा तयार झाल्यावर कढई गॅसवरून खाली काढून घ्या. मिश्रण चांगले मळून घ्या आणि पोलपाटावर किंवा ट्रेमध्ये तूप लावून हे मिश्रण लाटून घ्या. लाटल्यानंतर चाकूच्या साहाय्याने कतलीच्या आकारात कापून घ्या. अशाप्रकारे दिवाळीनिमित्त खास शेंगदाणा कतली खाण्यासाठी तयार…