Simple Garba Steps For Navratri 2023 : उद्या १५ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होईल. घरोघरी घट बसवले जातील; तर सार्वजनिक ठिकाणी देवीची मंडपात घटस्थापना करण्यात येईल. यादरम्यान नऊ दिवस देवीला नऊ रंगांच्या साड्या नेसवल्या जातात आणि देवीसमोर गरबादेखील खेळण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी मंडपात देवीसमोर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेक जण गरबा खेळतात आणि आनंद लुटतात. पण, बऱ्याच जणांना इच्छा असूनही गरबा खेळता येत नाही. त्यांच्यासाठी आज आम्ही तुम्हाला गरब्याच्या काही सोप्या स्टेप्स दाखवणार आहोत. @rohit_dance0 या एका युजरने गरबा खेळण्यासाठी काही सोप्या स्टेप्स दाखवल्या आहेत; जे पाहून तुम्हीही गरबा खेळू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजरने चार सोप्या गरबा स्टेप्स व्हिडीओत दाखवल्या आहेत; ज्या पाहून तुम्ही घरीच सराव करून गरबा खेळताना त्याचा उपयोग करू शकता.

स्टेप क्रमांक १ :
डावा हात कमरेवर ठेवा आणि तुम्ही स्वतःभोवती गोल गोल फिरा. गोल फिरताना उजव्या हाताचे कोपर दाखवत डान्स करताना जशी आपण स्टेप करतो अगदी तसे करा.

स्टेप क्रमांक २ :
दोन्ही हातांना एकदा उजव्या बाजूला अर्धवर्तुळाकार फिरवून खांद्यापर्यंत घेऊन जा. तसेच एकदा डाव्या बाजूला दोन्ही हात अर्धवर्तुळाकार फिरवून खांद्यापर्यंत घेऊन जा. असे दोनदा करा आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे ही स्टेप एकदा वेगातदेखील करून पाहा.

स्टेप क्रमांक ३ :
खाली वाकून दोन्ही हातांनी समोर एक टाळी वाजवा आणि मागे वळून पाहा. मग दोन्ही हात मागच्या दिशेला घेऊन जा आणि गाणे लावून वेगात ही स्टेप करण्याचा प्रयत्न करा .

स्टेप क्रमांक ४ :
या गरबा स्टेपला चार टाळी गरबा स्टेप म्हणतात. गरबा करताना एकदा डाव्या बाजूला हाताने टाळी वाजवा; तसेच एकदा उजव्या बाजूला टाळी वाजवा आणि असे पुन्हा एकदा करा. म्हणजे दोनदा डावीकडे; तर दोनदा उजवीकडे टाळी वाजवा आणि गाणे वाजल्यावर ही स्टेप थोडी वेगात करण्याचा प्रयत्न करा.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @rohit_dance0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरचे नाव रोहित वर्मा आहे तसेच तो कोरिओग्राफर आहे.तुम्हीसुद्धा गरबा खेळताना या स्टेप्स नक्की करून पाहा आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटा.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these easy steps while playing garba in navratri asp