Navratri २०२३ : सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आजचा रंग लाल आहे.. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेक जण रंगांप्रमाणे वेशभूषा करतात आणि गरबा, दांडिया, डिस्को गरबा यांचा आनंद लुटतात. पण, आज नवरात्रीनिमित्त आपण एका खास तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत; जी स्केटिंगवर गरबा खेळते. मुंबईत राहणाऱ्या या तरुणीला तिच्या शालेय जीवनात स्केटिंग हा खेळ शिकवण्यात आला होता, तर या खेळाचा भविष्यात उपयोग करून तिने या संधीचे सोने केले आहे.

नमस्वी हुकेरीकर (Namasvi Hukerikar) असे या तरुणीचे नाव आहे. नमस्वीने उत्पल शंघवी ग्लोबल शाळेत (Utpal Shanghavi Global School) स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत पाचवी इयत्तेत असल्यापासून तिने स्केटिंग शिकायला सुरुवात केली. नमस्वीच्या शाळेत स्केटिंग हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला जायचा. स्केटिंग शिकवण्यासाठी त्यांच्या शाळेत एक प्रशिक्षक (coach) नेमून दिला होता. त्यामुळे तिच्यात स्केटिंग शिकण्याची रुची निर्माण झाली. पण, काही वैयक्तिक कारणांमुळे तिने एकच वर्ष शाळेत स्केटिंग शिकले. पण, यादरम्यान तिच्यात स्केटिंगबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. म्हणून ती अभ्यासातून जसा वेळ मिळेल तसं रस्त्यावर स्केटिंग करायची आणि तिची आवड पूर्ण करायची. त्यानंतर पुढे महाविद्यालयात तिने बीएमएम (BMM) या कोर्सची निवड करून पदवी प्राप्त केली आहे. शाळा आणि कॉलेजबरोबरच तिने स्केटिंगचाही प्रवास सुरूच ठेवला.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

स्केटिंग क्लासेसची अशी झाली सुरुवात :

नमस्वी जेव्हा आवड म्हणून रस्त्यावर स्केटिंग करायची, तेव्हा तिचे कौशल्य पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी तिला थांबवून तिच्याकडून तिचा नंबर घेतला आणि आम्हाला स्केटिंग शिकवशील का असे विचारले ? यावर तिने खूप विचार केला. तसेच नमस्वीला शाळेत स्केटिंग शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने (कोचने) लहान मुलांना स्केटिंग शिकवण्यासाठी तिला प्रेरित केलं आणि म्हणाले, तू लहान मुलांना शिकवू शकतेस, एकदा प्रयत्न तर करून बघ. त्यानंतर तिने मनाशी निश्चय केला. ते म्हणतात ना की, तुम्ही मनापासून ठरवलं तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. तसंच काहीसं इथे घडलं आणि २०२१ पासून वयाच्या १८ व्या वर्षी नमस्वीने स्वतःचे स्केटिंग क्लासेस सुरू केले आणि स्केटिंग खेळाचे महत्व सगळ्यांपर्यंत पोहचवले. लहान मुलांचे स्केटिंग क्लास, कॉलेज आणि इंटर्नशिप या तिन्ही गोष्टी ती सुरुवातीला एकत्र करायची. पण, स्केटिंगमध्ये जास्त रुची असल्यामुळे तिला इंटर्नशिप करणे अवघड जात होते. स्केटिंग करताना मी माझी बॉस आहे, असे तिला नेहमी वाटायचे. कारण- स्केटिंग करताना कोणत्याही जोडीदाराची गरज लागत नाही; घरातून चाक असणारे स्केटर उचलायचे, पायात घालून स्केटिंग करण्यास सुरुवात करायची, असे स्केटिंग या खेळाचे खास वैशिष्ट्यसुद्धा तिने सांगितले आहे.

अन् स्केटिंगवर पहिल्यांदा गरबा केला :

नमस्वी दोन वर्षांपूर्वी नवरात्रीमध्ये तिच्या विद्यार्थ्यांसोबत गरबा खेळत होती. तेव्हा तिने स्केटिंगवर गरबा खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. तेव्हा नमस्वीने तिच्या एका विद्यार्थ्याला तिचा स्केटिंगवर गरबा करतानाचा क्षण व्हिडीओत शूट करण्यास सांगितला आणि तो व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्या व्हिडीओला पन्नास हजार (५०,०००) व्ह्यूज मिळाले. स्केटिंगवर गरबा ही खेळला जाऊ शकतो ही गोष्ट तिच्या लक्षात आली आणि त्यानंतर तिने “स्केटिंगवर गरबा” करण्याचे वर्कशॉप घेण्याचे ठरवले. पण, त्याच दिवशी तिचा अपघात झाला. पण, तिने हार न मानता पुढच्या वर्षी नव्या जोमाने स्केटिंगवर गरबा करण्याचे ठरवले आणि आज ती स्केटिंगवर गरबा करण्याचा आनंद लुटते आहे आणि लहान मुलांनाही शिकवते आहे. @skatewithnam असे नमस्वीच्या क्लासेसचं नाव आहे. सुरुवातीला ती सहा मुलांना शिकवत होती, आता तिच्या क्लासमध्ये तीस मुलं आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन ती स्वतः मुलांचे खासगी (private) क्लासेस घेते. स्केटिंगवर तरुणी कसा गरबा खेळते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…‘लहानपण देगा देवा… चिमुकलीचा जबरदस्त गरबा डान्स एकदा पाहाच; व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

स्केटिंग क्षेत्रातील कामगिरी :

नमस्वीने शाळेत असल्यापासून राष्ट्रीय स्तरावरील (National Level) अनेक स्पर्धेत भाग घेतला आहे. तसेच “आझादीचा अमृत महोत्सव” या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तिथे तिने नऊवारी नेसून, जिजाऊचा यांचा पेहराव करून, हातात भारताचा झेंडा घेऊन नरिमन पॉईंटला अभिमानाने स्केटिंग केलं आणि तृतीय पारितोषिक पटकावले.

“आझादीचा अमृत महोत्सव” या स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले((सौजन्य: इन्स्टाग्राम/@namasvi_h)

स्केटिंग खेळाला करियर म्हणून निवडले :

नमस्वीचा फॅशन हा विषय अगदीच आवडीचा आहे. ती इन्स्टाग्राम ब्लॉगरसुद्धा आहे. तसेच तिला स्केटिंग करायला आणि विविध ठिकाणांना भेट द्यायला आवडते. तर कला आणि आवड एकत्र मिळून तिला करियर (career) करायचे होते. म्हणून तिने स्केटिंगचा उपयोग तिची कला जोपासण्यासाठी आणि आवड पूर्ण करण्यासाठी केला. ती प्रत्येक ठिकाणी फिरायला जाते तेव्हा तिचे स्केटिंग सोबत घेऊन जाते आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तिची स्केटिंग करण्याची आवड पूर्ण करते. जणू काही स्केटिंग तिचा जोडीदाराच आहे.

२०२३ च्या काळात लोकं डॉक्टर, इंजिनियर होण्याची स्वप्न पाहतात, त्या काळात मुंबईच्या या मुलीने “स्केटर” होण्याचं अनोखं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आपले कौशल्य इतरांपर्यंतसुद्धा पोहचवले. तर स्केटिंगवर गरबा खेळणाऱ्या नमस्वीच्या या अनोख्या कौशल्याला दाद देऊन आपणसुद्धा तिला सलाम करूयात .