How To clean Gold Jewellery दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ११ नोव्हेंबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. नवीन कपड्यांपासून, सोन्या-चांदिच्या दागिन्यांचीही खरेदी सुरु आहे. मात्र आता प्रत्येक दिवाळीत सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करता येत नाहीत. अशावेळी आपण पॉलिशसाठी, झळाळी आणण्यासाठी ते सोनाराकडे देतो. मात्र आता घरच्या घरीही तुम्ही तुमचे दागिने चमकवू शकता. चला तर पाहुयात घरातील काही गोष्टींचा वापर करुन दागीने कसे चमकवता येतात.
दिवाळीत तुमचे चांदीचे दागिने अगदी नवीन दिसावेत असे वाटत असेल तर तुम्ही ही युक्ती अवश्य वापरून पहा.
टूथपेस्ट
सर्वांत सोपा उपाय म्हणजे रोजच्या वापरातली टूथपेस्ट. टूथपेस्ट आपल्या घरात असतेच, याचा वापर करुन तुम्ही चांदीच्या वस्तू चमकवू शकता. पण लक्षात घ्या चांदीच्या वस्तू घासण्यासाठी फक्त पांढरी पेस्ट किंवा टूथ पावडरच उपयोगी पडते. घरातल्या जुन्या ब्रशवर पेस्ट घेऊन त्याने चांदीची भांडी किंवा वस्तू घासा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग गरम पाण्याने धुवा. चांदीच्या वस्तू पुन्हा नव्यासारख्या दिसतील.
लिंबू
दुसरा उपाय म्हणजे लिंबू. आपल्या सगळ्यांच्याच घरात लिंबू असतं, लिंबामधील अॅसिड काळपटपणा दूर करतं. यामध्ये तुम्ही लिंबू आणि मीठ वापरूनही तुम्ही चांदीची ज्वेलरी किंवा वस्तू चमकवू शकता. लिंबाच्या रसात मीठ घालून ते वापरा. तसंच कपडे धुण्याची साबण पावडर गरम पाण्यात घालून त्यात चांदीच्या वस्तू ठेवा आणि काही वेळाने चोळून धुऊन टाका.
हेही वाचा >> VIDEO : बॉक्स, पेपरपासून दिवाळीला घरीच बनवा आकाशकंदील; ‘या’ सोप्या टिप्स पाहा
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याच्या मदतीने सोन्याचे दागिने चमकवू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकात सर्रास वापरला जातो. याच्या वापराने सोन्याचे दागिने देखील स्वच्छ करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त २ चमचे सोडा कोमट पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट बनवायची आहे. यांनतर दागिने त्यात अर्धा तास बुडवून ठेवा. नंतर स्पंजने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.