दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वत्र या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठ्या, गल्ल्या रोषणाईने सजलेल्या दिसत आहेत. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस चालणारा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्थान करण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाची चांगली सुरुवात उटणे लावूनच केली जाते. दिवाळी जवळ आली की बाजारात मोठ्या प्रमाणात उटणे पाहायला मिळतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये केमिकल्स मिसळल्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच उटणे तयार केल्यास ते फायद्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी उटणे कसे बनवायचे आणि त्याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
उटण्याचे महत्व
उटण्याचा वापर सौंदर्यासाठी राजा-महाराजांपासून केला जात आहे. उटणे हे आयुर्वेदिक असल्याने ते त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरते. उटणे तयार करण्यासठी वेगवेगळे आयुर्वेदिक घटक आणि सुगंधी तेलाचा वापर केला जातो. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
( हे ही वाचा: Diwali 2022 : दिवाळीच्या आधी साजरी केली जाते धनत्रयोदशी; जाणून घ्या या सणामागे असणारी रंजक कथा)
उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- बेसन
- दूध
- क्रिम
- हळद
- लिंबाचा रस
- तीळ
- गुलाब जल
उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला घरातही सहज उपलब्ध होऊ शकते. सुगंधी उटणे तयार करण्यासाठी दूध, बेसन, हळद, फ्रेश क्रिम, लिंबाचा रस, तिळ आणि गुलाब जल वापरले जाते. यात तुम्ही इतर काही वेगवेगळ्या घटकांचा वापर करू शकता. सुगंधी उटणे बनवण्यासाठी या सर्व गोष्टी एकत्र करून त्यांची चांगली पेस्ट करून घ्या. यानंतर तुमचे सुगंधी उटणे घरच्याघरी बनवून तयार आहे. तुम्ही ही तयार केलेली पेस्ट दिवाळी दिवशी अंगावर लावून आंघोळ करू शकता. याने तुमची त्वचा चांगली मऊ सुद्धा बनेल आणि हे उटणे केमिकल शिवाय असल्याने कोणतेही साईड इफेक्ट्स सुद्धा होणार नाहीत.
( हे ही वाचा: Diwali 2022 : २२ की २३, नक्की कोणत्या दिवशी साजरी होणार धनत्रोयदशी? ‘या’ वस्तूंची खरेदी मानली जाते अशुभ)
घरगुती उटणे लावण्याचे फायदे
- उटणे लावल्याने अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने शरीरातील दोषांचा विचार करून उटण्याचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही शरीरातील दोष लक्षात घेऊन तयार केलेले उटणे लावल्यास त्वचेची पीएच लेव्हल संतुलीत राहते.
- जर व्यक्तीला वाताचा त्रास असेल तर तयार केलेले उटणे फायद्याचे ठरू शकते. ते तुमच्या त्वचेला पोषण देते. तुम्ही हे उटणे सामान्य तापमानावरच वापरू शकता. तसंच तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असल्यास हे उटणे उपयुक्त ठरेल.
- जर तुम्हाला पित्त दोष असेल तर हे तयार केलेले उटणे थंड तापमाणात लावावे. हे उटणे तुम्हाला शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
- जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स किंवा पुरळ असतील तर हे उटणे त्यांना घालवण्यासाठी फायदेशीर आहे.
- जर तुम्हाला कफाची समस्या असेल तर त्या व्यक्तींनी तयार केलेल्या उटण्यात गरम तेल घालून मिक्स करावे. हे उटणे शरीरातील कफा संदर्भातील समस्या दूर करते.